
अमळनेर : रस्त्यात अडथळे आणणाऱ्या वाहने तसेच हातगाड्यांवर पोलिसांनी कारवाई करून न्यायालयाने २२ जणांना १२ हजार १०० रुपये दंड ठोठावला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक पोलीस संजय बोरसे , विनय पाटील ,रवींद्र बोरसे याना चोपडा धुळे रस्त्यावर अडथळे आणणाऱ्या वाहने आणि काही प्रवासी वाहने , किरकोळ विक्रेते , हातगाड्या यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. महाराणा प्रताप चौक ते दगडी दरवाजा ते वसा या दरम्यान हातगाड्या आणि थांबलेल्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहनचालकांना तसेच सामान्य नागरिकांना खूप त्रास होत होता.
पोलिसांनी भारतीय न्यायासंहिता कलम २८५ प्रमाणे १३ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्या डी टी वसावे यांनी प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०२,११७ प्रमाणे सहा हातगाड्यावर कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी ५०० रुपये दंड तसेच जादा प्रवासी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर कलम ६६, १९२ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असता वाट्याला दोन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.




