
महसूल अधिकारी आता फक्त निवडणूक आणि आपत्तीचे काम करणार…
अमळनेर : आपल्या विविध मागण्यांसाठी ग्राममहसुल अधिकारी ,मंडळाधिकारी , अव्वल कारकून आणि नायब तहसीलदार संघटनेने डिजिटल सिग्नेचर डी एस सी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्याकडे जमा करून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी शासनाकडे लॅपटॉप आणि प्रिंटर ची मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे.ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे दिलेले लॅपटॉप आणि कॉम्प्युटर कालबाह्य झाले आहेत. त्यांची मुदत पाच वर्ष असताना अनेक वर्षे उलटली. त्यामुळे व्हर्जन बदलले ,स्पीड मिळत नाही आदी अनेक अडचणी आहेत. ते तात्काळ मिळावेत , कालबाह्य उपकरणांची विल्हेवाट लावण्यात यावी , खरेदी प्रक्रियेतील अनावश्यक विलंब प्रक्रिया जबाबदारी विभागीय स्तरावर निश्चित करण्यात यावी आदी मागण्यांसह अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील वाळू माफियांनी केलेल्या हल्ला प्रकरणातील सर्व आरोपी शस्रांसह जमा करत नाहीत तोपर्यंत निवडणूक व आपत्तीचे कामकाज वगळता कोणतेच काम करणार नाहीत असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देताना अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील , सचिव मुकेश देसले ,मधुकर पाटील ,प्रशांत पवार , भूषण पाटील ,प्रवीण कंखरे , योगेश पाटील ,विठ्ठल पाटील , रवींद्र माळी ,प्रवीण बेलदार , पवन शिंगारे ,गीता बडगुजर , शीतल पाटील , आदिती जरे ,द्रौपदी पजई ,गौरव शिरसाठ , नायब तहसीलदार सी यु पाटील हजर होते.




