
–
एका किंटल मागे पाच ते सहा किलो कट्टी ?
अमळनेर– येथील पिंपळे रस्त्यावरील लामा जिनिंग येथे सी. सी.आय. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दररोज मोजकेच शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात असून एका क्विंटल मागे पाच ते सहा किलो कट्टी लावली जात असल्याने येथील सी सी आय केंद्रात शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना सी. सी.आय. केंद्रात कापूस विक्रीसाठी सुरुवातीला ऑनलाइन नाव नोंदणी करावी लागते. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर स्लॉट बुकिंग करावा लागतो मात्र सध्या स्लाँट बुकिंग होत नसल्याने शेतकरी ताटकळत बसला आहे. परिणामी बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.मात्र याकडे कुणीही लक्ष घालत नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. दररोज फक्त तीस वाहन मोजली जातं आहेत. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी साठी नंबर केव्हा लागेल शेतकऱ्यांनी किती दिवस सी. सी.आय. केंद्राच्या आशेवर राहावे असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून ज्या शेतकऱ्यांनी कापूस सी.सी. आय.मध्ये आणला आहे. त्यांचाही माल खरेदी करताना कट्टी लावली जातं आहे. मात्र पावतीवर नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांनी तोंड उघडले तर नाक बंद! असा प्रकार दिसून येत आहे.भाव काय निश्चित होईल याचा भरवसा नाही. मात्र आणलेला माल विक्री करून जायचे याशिवाय पर्याय नसल्यामुळे विक्री मालाला कट्टी आणि पुन्हा त्यात ग्रेड यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे बोलले जातं आहे.
प्रतिक्रिया… तालुक्यात सुमारे पन्नास हजार शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे. सी.सी. आय. केंद्रात दररोज फक्त तीस वाहन खरेदी केली जातं आहे. त्यात पुन्हा आठवड्याची सुट्टी यात फक्त महिन्याला सहाशे ते सातशेचं वाहन खरेदी केली जातील परिणामी चार महिन्यात किती शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जाईल याचा विचार करून अजून दोन केंद्र सुरु करण्यात यावीत. कापूस खरेदी करताना कट्टी न लावता शेतकऱ्यांची लूट थांबवावी. – प्रा. सुभाष पाटील (संचालक -बाजार समिती अमळनेर )
प्रतिक्रिया…
कुठल्याही शेतकऱ्यांच्या कापूस मालाला कट्टी लावली जात नसून ज्या शेतकऱ्यांच्या कापूस मालाला कट्टी लावली जाईल त्यांनी माझ्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी आपला कापूस साफसुधरा आणावा असे आवाहन केले. -योगेश राजपूत (ग्रेडर)




