
रविवारी होणार मतमोजणी, ६० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती…
अमळनेर -अमळनेर पालिकेत प्रभाग क्रमांक १अ च्या जागेसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभागात एकूण ६ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर ६ अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. तसेच मतदाराच्या मधल्या बुटाला शाई लावली जाणार आहे.
शहरातील इंदिरा गांधी भवन येथे रविवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका, महसूल व पोलीस प्रशासन सज्ज असून मतमोजणीसाठी ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही मतमोजणी प्रभाग निहाय होईल. मतमोजणी करिता १३ टेबल व टपाली मतमोजणी करिता २ असे एकूण १५ टेबल असणार आहेत. सर्व मतमोजणी प्रतिनिधी यांनी ८.३० वाजेपर्यंत मतमोजणी सभागृह बाहेर उपस्थित राहावे.पहिला प्रभागाची मतमोजणी संपल्यावर मतमोजणी प्रतिनिधी हे मतमोजणी सभागृहाबाहेर जातील व पुढील प्रभागाचे मतमोजणी प्रतिनिधी सभागृहात प्रवेश करतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.




