
अमळनेर : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार डॉ. परीक्षित बाविस्कर हे ८ हजार ६६५ मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांनी शहरविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर याना पराभूत केले आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी अमळनेर शहराच्या राजकारणात विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यावर राजकीय मात केली आहे.
अमळनेरात अपक्षांनी आघाडी घेतली असून 11 अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. तर शहर विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला १० आणि शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीला २ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १ जागा मिळाल्या आहेत. नगराध्यक्ष शिवसेनेचा बसल्याने अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
डॉ परीक्षित बाविस्कर याना ३० हजार ८५६ मते मिळाली तर जितेंद्र ठाकूर याना २२ हजार २०८ मते मिळाली आहेत. एकूण ५७ हजार ९६० मतदान झाले होते.
प्रभाग प्रमाणे निवडून आलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे
प्रभाग क्र.१ अ- कविता विजय राजपूत ( शहर विकास आघाडी)१३५० , प्रभाग क्र.१ ब :- कैलास नामदेव पाटील ( अपक्ष )१३४६ ,
प्रभाग क्र.२ अ :- कांबळे देवेंद्र भानुदास ( शहर विकास आघाडी)१४८८ , प्रभाग क्र.२ ब:- अफसाना मुक्तार खाटीक
( शहर विकास आघाडी)१६३३,
प्रभाग क्र.३ अ:- शोभाबाई भिवसन गढरी
( शहर विकास आघाडी )१४१३,प्रभाग क्र.३ ब :- भरतकुमार सुरेश ललवाणी ( शहर विकास आघाडी ) १२८० ,
प्रभाग क्र.४ अ :- नंदा नरेंद्र संदानशिव ( शहर विकास आघाडी )१९०० प्रभाग क्र.४ ब :- शेख नाविद अहमद मुशिरोद्दीन ( शिवसेना)१४९१ ,
प्रभाग क्र.५ अ :-श्रीराम भगवान चौधरी ( शिवसेना) १४५४ ,प्रभाग क्र.५ ब :-परदेशी कल्पना भरतसिंग ( अपक्ष )१३९२ ,
प्रभाग क्र.६ अ :- सविता योगराज संदानशिव
( अपक्ष)२०७४ , प्रभाग क्र. ६ ब :- चौगुले दीपक हरी ( अपक्ष)१९२६
प्रभाग क्र.७ अ:- योगिता सयाजीराव कापडणेकर ( अपक्ष )१२४१, प्रभाग क्र.७ ब :- पाटील प्रवीण गंगाराम
( अपक्ष )१३३२ ,
प्रभाग क्र.८ अ पाटील सचिन बळवंत बिनविरोध ( शहर विकास आघाडी ) प्रभाग क्र ८ ब :- अपूर्वा जालिंदर चौधरी (शिवसेना ) १४५३ ,
प्रभाग क्र.९ अ :- शर्मा कल्पना चंद्रकांत ( शिवसेना )१३३१, प्रभाग क्र.९ ब :-चौधरी पंकज पंडित ( शिवसेना )१५३७,
प्रभाग क्र.१० अ :-सचिन विभाकर कासार ( शहर विकास आघाडी ) १४७७ , प्रभाग क्र.१० ब:-स्वाती सूरजसिंग परदेशी ( अपक्ष )११८२ ,
प्रभाग क्र.११ अ :- पाटील छाया बाळू ( अपक्ष) १६३७ ,प्रभाग क्र.११ ब :- विजय कहारू पाटील ( शहर विकास आघाडी )२१७६ ,
प्रभाग क्र.१२ अ :-पुष्पा पंकज भोई ( शिवसेना )१५८६, प्रभाग क्र.१२ ब :- धनगर सुयोग ज्ञानेश्वर ( शिवसेना )१६१८ ,
प्रभाग क्र.१३ अ :- जुबेदाबी नसिरोद्दीन शेख ( शहर विकास आघाडी)१८९८ ,
प्रभाग क्र.१३ ब:- अनिल गंगाराम महाजन ( शिवसेना)१६६६,
प्रभाग क्र.१४ अ:- सुवर्णा तुळशीराम हटकर ( अपक्ष)१२८५,प्रभाग क्र.१४ ब:- रामकृष्ण बाबुराव पाटील ( अपक्ष)९२३ ,
प्रभाग क्र.१५ अ :- प्रशांत निकम (राष्ट्रवादी शरद पवार गट)११४० , प्रभाग क्र.१५ ब :- जयश्री अनिल पाटील ( शहर विकास आघाडी)१३३७,
प्रभाग क्र.१६ अ:- महेश प्रभाकर देशमुख ( अपक्ष )१२५९ , प्रभाग क्र.१६ ब:- नीलिमा विश्वनाथ पाटील ( अपक्ष )१५८२,
प्रभाग क्र.१७ अ :- सपना विक्रांत पाटील ( शविआ)१९१५ , प्रभाग क्र.१७ ब :- पवार साहेबराव वसंत (शिवसेना) १२८६ ,
प्रभाग क्र.१८ अ :- तडवी इर्षाद सुनील ( शिवसेना )१३५७ , प्रभाग क्र.१८ ब :- रुपाली विलास शिवदे ( अपक्ष ) १९६५
शहर विकास आघाडी -१२
शिवसेना – १०
शिवसेना पुरस्कृत(शिरीष दादा मित्र परिवार आघाडी ) – २
अपक्ष – ११
राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) – १
प्रमुख पराभूत उमेदवार
आमदार अनिल पाटील यांच्या जवळच्या मानल्या जाणारे उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यात माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी , माजी नगरसेवक विनोद कदम , चेतन राजपूत , रेखा संजय पाटील , माजी नगरसेवक प्रताप शिंपी , माजी नगरसेवक विनोद लांबोळे यांच्या पत्नी अनिता लांबोळे , हेमंत पवार , माजी उपनगराध्यक्षा सबनूरबी सलीम शेख , इम्रान खाटीक , माजी नगरसेवक मनोज पाटील , माजी नगरसेविका ऍड चेतना पाटील , माजी नगरसेवक प्रताप साळी, माजी नगरसेवक राजेश पाटील , विद्या भदाणे पराभूत झाले आहेत
तर माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या गटातील माजी नगरसेवक प्रवीण पाठक , माजी नगरसेवक देविदास महाजन यांच्या पत्नी उज्वला महाजन , सुनील भामरे हे पराभूत झाले आहेत.




