
अमळनेर : घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल सह घरातील चांदीचे देव चोरून नेल्याची घटना कलागुरू ड्रीम सिटी मध्ये १९ रोजी रात्री घडली.
प्रेमलता आबाजी पाटील यांच्या घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने चांदीच्या एकूण १२ तोळे वजनाच्या गणपती , महालक्ष्मी , शिव पार्वती ,अन्नपूर्णा देवीची प्रत्येकी २१०० रुपये किमतीच्या अशा ६ हजार ४०० रुपयांच्या मुर्त्या , ७०० रुपये किमतीचे बाळकृष्ण देवांचा टोप , २८०० रुपये किमतीचे चांदीचे देवांचे शिक्के असलेले चांदीचे नाणे आणि ३५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल असे एकूण ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. इतर तीन घरांचे देखील कडीकोंडे तोडण्यात आल्याची माहिती आहे. महिलेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला ३३१(३) ,३३१ (४), ३०५ ,३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास एपीआय रवींद्र पिंगळे करीत आहेत.




