
अमळनेर : शहरात विविध दुकाने फोडणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अंकलेश्वर येथून अटक केली आहे.
शहरातील मध्यवस्तीत बाजारपेठेत नुकतीच चार पाच दुकाने पत्रा कापून ,शेड कापून फोडण्यात आली आणि त्यातील वस्तू चोरीस गेल्याने शहरात खळबळ माजली होती. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यांना एक संशयित चोरी करताना आढळला. त्याचा चेहरा पाहिला असता तो प्रशांत जगन वालडे मूळ राहणार गोरंगावले तालुका चोपडा व हल्ली मुक्काम अंकलेश्वर गुजरात असा आढळून आला. त्याने यापूर्वी देखील अनेक चोऱ्या करण्यात त्याचा हातखंडा होता. पोलीस निरीक्षक निकम यांनी प्रशांत पाटील , उज्वल म्हस्के , गणेश पाटील , निलेश मोरे , नितीन मनोरे , विनोद संदानशीव या पोलिसांच्या पथकाला अंकलेश्वर येथे चोरांचा शोध घेण्यासाठी पाठवले. सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे प्रशांत वालडे याचा मागोवा घेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




