
अमळनेर: येथील बस स्थानकावर दुपारी साडेबाराच्या सुमारास बस फलाटावर लावताना झालेल्या प्रवाशांच्या गोंधळात चार ते पाच मुली खाली पडल्या. यामध्ये दोन शालेय विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली. अमळनेर–एकरुखी बस डेपोतून बस फलाटावर लावण्यासाठी बाहेर निघाली असताना शाळा सुटल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
बस मध्ये चढण्यासाठी झालेल्या चढाओढीत दोन शाळकरी मुलींना धक्का लागून त्या लोटल्या गेल्या. याच वेळी बसचा धक्का बसल्याने त्या खाली पडून जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींमध्ये एकरुखी येथील मयुरी अनिल पाटील (इयत्ता तिसरी, साने गुरुजी विद्यामंदिर, अमळनेर) व रढावण येथील जानवी नितेश पवार (इयत्ता पाचवी, डी. आर. कन्या शाळा) यांचा समावेश आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. उपस्थित प्रवासी व नागरिकांनी तत्काळ जखमी विद्यार्थिनींना अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी दोन्ही चिमुरड्यांच्या पायाला दुखापत झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही शाळांच्या शिक्षकांच्या उपस्थितीत पुढील उपचारासाठी विद्यार्थिनींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अमळनेर बस स्थानकावर शालेय वेळेत होणारी गर्दी, अपुरी जागा व नियोजनाचा अभाव यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा बसेस फलाटावर न लावता उलट्या दिशेने उभ्या केल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना चढताना–उतरताना अडचणी येतात. काही वेळा प्रवासी रस्त्यावर, झाडाखाली किंवा बस स्थानकाच्या कडेला उभे राहण्यास भाग पडतात आणि बस तेथेच लागल्याने गोंधळ उडतो. परिणामी प्रवासी पडण्याच्या घटनाही घडत असल्याचे चित्र आहे.
“आजची घटना बस पलटावर लागत असतानाची घडली गर्दीच्या माहोल एकमेकांन धक्का देत यात त्यांना बसेसचा धक्का लागला लागल्याने त्या तरुणी खाली पडल्याची ही घटना घडली आहे. तसेच बसस्थानकातील जागा अपुरी असल्याने काही गावांच्या बसेस त्याच ठिकाणी थांबवल्या जात असल्याचे आगार प्रमुख पी. बी. चौधरी यांनी स्पष्ट केले.”
मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने शालेय वेळेत स्वतंत्र नियोजन, बसेस नियमितपणे फलाटावर लावणे, शिस्तबद्ध रांग व्यवस्था व कर्मचारी नियुक्ती करण्याची ठाम मागणी प्रवासी व पालकांकडून करण्यात येत




