
अमळनेर:- तालुक्यातील भरवस शिवारातून अज्ञात चोरट्याने २६०० मीटर लांबीची विद्युत तार चोरून नेल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
लाईनमन अशोक वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भरवस ते बेटावद रस्त्यावरील भरवस शिवारात २२ ते २३ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्याने विद्युत तार चोरून नेल्याची माहिती मिळाल्याने फिर्यादी घटनास्थळी गेले असता ३२ हजार रुपये किमतीची २६०० मीटर लांब अल्युमिनियमची तार चोरीला गेल्याचे उघड झाले. याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी करीत आहेत.



