
रोख रकमेसह वस्तू केल्या होत्या हडप, तरुणांच्या सतर्कतेने लुटण्याचा प्रकार उघडकीस
अमळनेर: दुकानदारांना विविध वस्तूंचा वास देऊन त्यांना वश करून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचा प्रकार करणाऱ्या चार साधूंच्या टोळीला पब्लिकने चांगलाच चोप देऊन पोलीस स्टेशनला जमा केल्यावर तेथेही ‘प्रसाद’ देण्यात आला.
२५ रोजी शहरात चार पाच साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली. धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात चार जणांनी साधूंच्या वेशात समर्थ ट्रेडिंगचे मालक जितेंद्र पाटील या दुकानदाराजवळ गेला आणि टिळा लावला आणि येऊन कशाच्या तरी सुगंधाच्या नावाखाली किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाचा वापर करून त्याला फसवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनतर साधूने बळजबरी दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि जितेंद्र पाटील यांच्या गल्ल्यात हात घातला. प्रकारात त्याच्याकडून ५ हजार रोख रक्कम तसेच इतर वस्तू हडप केले. सुदैवाने लक्ष्मी प्रिंटिंग चे संचालक अतुल भदाणे आणि सनी पाटील , कार्तिक चौधरी , मेहुल चौधरी ,शेषनाथ बागुल , यांनी पाहिला. त्यांनी तात्काळ जवळ जाऊन दुकानदाराला सावध केले. साधूना पकडताच त्यांनी घेतलेले पैसे काढून दिले.
हे कळताच लोक जमले आणि त्यांनी संधी साधूंना चोप दिला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन संबंधित बहिरूपी साधूंना ताब्यात घेतले आणि चांगलाच ‘प्रसाद’ दिला. हे चारही साधू गुजरात येथील असल्याचे समजते.
काही ढोंगी साधू भोळ्या भाबड्या जनतेच्या नैराश्याचा फायदा घेत भविष्य आणि उपाययोजना सांगण्याचा प्रयत्न करून लुबाडण्याचा प्रयत्न करतात. नन्तर मोहिनी टाकून सरळ घरात अथवा दुकानात प्रवेश करून लूटमार करून नेतात. त्यामुळे नागरिकानी सतर्क राहावे ,अंधश्रध्येला बळी पडू नये. कुंभमेळा ,पायी वारी , नवनाथ , गडावर जायच्या नावाने ,दिंडी वारीच्या नावाने देखील काही लोक फसवणूक करतात नागरिकांनी संशय आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.




