
अमळनेर:-येथील खा.शि. मंडळाची निवडणूक दि. 04 जानेवारी रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे सकाळी 8 ते. ते 5 या वेळेत होणार आहे.
त्यासाठी 10 -10 बुथची व्यवस्था केलेली आहे. मतदानास येणाऱ्या प्रत्येक मतदार सभासदाने सोबत फोटो ओळखपत्र (मुळ आधार कार्ड व एक प्रत झेरॉक्स) तसेच ज्या सभासदांनी फोटो व आधार कार्डच्या झेरॉक्स सह संस्थेच्या कार्यालयात फॉर्म जमा केलेले नाही अशा सभासदांनी एक पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक (अनिवार्य) आहे. ओळखीसाठी शासन मान्यता प्राप्त असलेले ओळखपत्र (आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड इत्यादी) आणावे. अध्यक्ष पदासाठी-1, विश्वरत पदासाठी 1 व उपाध्यक्ष पदासाठी-2 मते देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा जास्त मते दिल्यास मतपत्रिका बाद होईल. तसेच कार्यकारी मंडळ सदस्य पदासाठी-8 मते देण्याचा अधिकार आहे. त्यापेक्षा अधिक मते दिल्यास मतपत्रिका बाद होईल याची सर्व सभासद बंधू-भगिनी (पेट्रन/व्हाईस पेट्रन/फेलो) यांनी नोंद घ्यावी. मतदारांना महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश देण्यात येणार आहे. व महाविद्यालयाच्या कार्यालया समोरील प्रांगणात वाहन पार्किंग करून मुख्य प्रवेशद्वारातुन संख्याशास्त्र विभागाकडून मतदान केंद्रात प्रवेश करून मतदान झाल्यावर मतदारास सायकल स्टैंड बाजूच्या रस्त्याने किंवा प्रताप हॉस्पिटलच्या समोरील प्रवेशद्वारातुन बाहेर जाण्याचा मार्ग राहील याची सर्व उमेदवार व मतदारांनी नोंद घ्यावी असे निवडणूक समितीने कळविले आहे.




