
नवीन कायद्याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात कार्यशाळा संपन्न…
अमळनेर : प्रत्येक गुन्ह्यात ई साक्ष नोंदवणे आवश्यक असून गुन्हा दाखल नसला तरी घटनास्थळी फोटो आणि व्हिडीओ काढून ठेवा. नवीन कायद्यानुसार ई साक्ष आवश्यक आहे. आणि दोषारोप पत्र ६० व ९० दिवसात दाखल झालेच पाहिजे तसेच वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आता वेळ मर्यादित आहे अशी माहिती डीवायएसपी विनायक कोते यांनी पोलिसांना नवीन कायद्याबाबत आयोजित कार्यशाळेत दिली.
अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे सर्व पोलीस कर्मचार्यांना नवीन भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ बाबत मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सरकारी वकील ऍड किशोर बागुल म्हणाले की सरकारी पंच नेताना त्यांचे आय डी कार्ड असणे आवश्यक आहे. नवीन बी एन एस कायद्यात शिक्षा वाढवण्यात आल्या आहेत. साक्ष कायद्यात बदल झाला आहे. फसवणुकीच्या गुन्हयात आरोपीच्या अटकेची कारणे देताना रक्कम वसुलीची गरज असल्याचे नमूद पाहिजे अन्यथा आरोपीना जामीन मिळतो. पूर्वी विनयभंगाचा गुन्हा कनिष्ठ न्यायालयात चालायचा आता तो सेशन कोर्टात चालतो.
ऍड राजेंद्र निकम मार्गदर्शन करताना म्हणाले की पूर्वीच्या आय पी सी मध्ये ५११ कलम होते आता सुधारणा करून बी एन एस मध्ये ३४३ कलम आहेत. नवीन कायद्यात आरोपीला त्याचे म्हणणे ऐकण्याची संधी दिली आहे. दोषारोप स्पष्ट असले पाहिजे खुनाच्या गुन्ह्यात खुनाची कारणे दिलीच पाहिजेत.
या कार्यशाळेस पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ , पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत ,प्रशांत पाटील ,सिद्धांत शिसोदे , राहुल पाटील , मिलिंद सोनार , विनोद सोनवणे , उज्वल म्हस्के , विनोद भोई , चंद्रकांत पाटील ,विनोद संदानशीव ,उज्वल पाटील ,श्रीकांत शिंपी , काशिनाथ पाटील , गणेश पाटील , हर्षल पाटील , योगेश बागुल , नितीन मनोरे ,देशमाने , नम्रता जरे ,श्यामल पारधी यांच्यासह ७० ते ८० पोलीस हजर होते.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.




