
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथील श्री गुरुदेव दत्त संस्थानचे अध्यक्ष निबा दला चौधरी यांचे सुपुत्र कामगार आयुक्त विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणेने डिजिटल अभ्यासिकाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भैरवी वाघ पलांडे, राकेश पाटील, पिंपळे खु गावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच योगेश पाटील संतोष चौधरी, सदस्य गोकुळ पाटील,पुरुषोत्तम चौधरी, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिजिटल अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एमपीएससी, व स्पर्धा परीक्षांची पुस्तके देण्यात येऊन मान्यवरांच्या हस्ते डिजिटल कक्ष व टिव्हीचे उद्घाटन करण्यात आले. कामगार आयुक्त विजय चौधरी यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना टिव्ही,पुस्तके
व स्पर्धा परीक्षाचे क्लासच्या लिंक मोफत उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते.




