
अमळनेर : शहरातील ख्वाजा नगरमध्ये २ रोजी पाणी फेकल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन दोन्ही गटातील पाच सहा जण जखमी झाले आहेत. तर दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयीलोद्दीन शकिलोद्दीन मुजावर रा ख्वाजानगर यांनी फिर्याद दिली की, २ रोजी सकाळी ११ वाजता त्यांची आजी सलामुन्नीसा घराच्या कम्पाउंड मध्ये बसलेली असताना जाफर बेलदार व अकबर बेलदार यांच्या बहिणीने भांडी धुण्याचे पाणी अंगणात फेकल्याने त्याना जाब विचारला असता ते शिवीगाळ करू लागले. पुन्हा दुपारी ३ वाजता जाफर बिस्मिल्ला बेलदार , अकबर बिस्मिल्ला बेलदार व त्यांच्या बहिणी भुरी आणि गुल्लो (पूर्ण नाव माहीत नाही) हे घरी आले आणि गेट उघडून शिवीगाळ करू लागले. चापट बुक्क्यांनी मारहाण केली अकबर बेलदार याने सोयीलोद्दीन ला पकडून जिवंत सोडू नका म्हणून धमकी दिली. आणि त्याच वेळी जाफर बेलदार याने हातातील चाकूने वार केला तो डाव्या हाताच्या बोटाना लागला. त्यावेळी गुल्लो हिने हातातील लोखंडी सळईने अकिलाबी हिच्या ओठावर मारल्याने तिच्या ओठातून रक्त निघाले तर जाफर याने पुन्हा हातातील चाकूने सोयीलोद्दीन च्या कपाळावर वार केला. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले. चारही आरोपीविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशन ला ११८(२),३५१(२), ३५२ पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे फरजाना जाफर बेलदार रा ख्वाजानगर यांनी फिर्याद दिली की तिची नणंद जरीना बिस्मिल्ला बेलदार ही घराला पाणी मारत असताना पाण्याचे शिंतोडे शकिल मुजावर याच्या आईच्या अंगावर पडल्याने सोयीलोद्दीन मुजावर , शोएब मुजावर यांनी शिवीगाळ सुरु केली पुन्हा पाणी उडवले तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. दुपारी ३ वाजता पती जाफर कामावरून घरी परत आल्यावर त्यांना भांडणाबाबत समजावण्यास गेले असता शकिलोद्दीन मुजावर , सोयीलोद्दीन मुजावर , जाकीरोद्दीन मुजावर , शोएब शकिलोद्दीन मुजावर यांनी जाफर याला पकडून दगडांनी मारून दुखापत केली. तर शोएब याने हातातील सुरीने जाफर याच्या हातावर वार केला. या भानगडीत जाफर ,गुलमानो बेलदार , रियासतबी बेलदार हे जखमी झाले आरोपींविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्यायासंहिता ११८(१) , ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.



