
समूह नृत्य प्रकारात मिळाले प्रथम पारितोषिक तर टाईमपास नाटकास प्रथम बक्षीस,
अमळनेर:-यंदाच्या नववर्षात नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले महिला महोत्सवात यंदाही न्यू प्लॉट महिला मंच प्रस्तुत सावित्रीच्या लेकींनीच मारली बाजी मारत समूह नृत्य प्रकारात त्यांना प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
न्यू प्लॉट महिला मंचने या महोत्सवात चौथ्यांदा प्रथम पारितोषिक मिळविण्याचा बहुमान मिळविला असून यंदाही या ग्रुपने सुंदर सादरीकरण करून उपस्थित महिलांची मने जिंकलीत. तसेच नाट्य स्पर्धेत टाईमपास या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले,या महोत्सवात चार दिवस महिलांनी मनमुराद आनंद घेतला.अमळनेर श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सावित्रीबाई फुले महिला महोत्सवाचे आयोजन 2 ते 4 जानेवारी पर्यंत करण्यात आले होते.चार दिवस महिलांसाठी भरगच्च कार्यक्रम असल्याने महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.अमळनेर नगरपरिषद व महिला मंच ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
दिनांक 24 डिसेंबर पासून घरगुती गच्चीवरील परसबाग स्पर्धा,पोत्यात पाय ठेऊन चालणे,गीता वाचन स्पर्धा, पाककृती स्पर्धा,10 मिनिटात म्हणी लिहण्याची स्पर्धा,अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने वॉकेथान स्पर्धा,मॅरेथॉन स्पर्धा,आदी स्पर्धा 31 डिसेंम्बर पर्यंत पार पडल्या या सर्व स्पर्धांना महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
महोत्सवा दरम्यान दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी पोस्टर रांगोळी स्पर्धा झाली त्यानंतर महिला महोत्सवाचे उद्घाटन खाऊ गल्ली तथा स्टॉलचे उद्घाटन झाले.3 जानेवारी रोजी दुपारी नाट्यप्रवेश स्पर्धा तर 4 जानेवारी रोजी एकल व समूह नृत्य स्पर्धा झाल्यात यात सर्वांनीच उत्कृष्ट सादरीकरण केले.तर 5 जानेवारी रोजी जाहिरात सादरीकरण स्पर्धा पार पडुन सौ रंजना पवार गवांदे यांचे महिला व अंधश्रद्धा या विषयावर व्याख्यान झाले यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सदर महोत्सवात आनंद मेळावा स्टॉल, खाऊ गल्ली, फॅशन बाजार, आकर्षक रुप श्रृंगार, परिधान, बाल गोपालांकरता गेम झोन समस्त नागरिकांसाठी खुले असल्याने सर्वानी सहपरिवार आनंद घेतला.
विविध स्पर्धेतील बक्षिसे पुढीलप्रमाणे–
समूह नृत्य स्पर्धा-प्रथम-न्यू प्लॉट महिला मंच प्रस्तुत सावित्रीच्या लेकी ग्रुप,
द्वितीय-सुवर्ण सखी,तृतीय-कृषिकन्या गृप
,चतुर्थ-रणरागिणी गृप,पाचवा-तेजस्विनी गृप.एकल नृत्य स्पर्धा( वयोगट 20 ते 35)-प्रथम- दिपाली आंबे,द्वितीय-कोमल बाफना,
तृतीय- माधुरी महाजन
.मधला गट(वयोगट 36 ते 50)प्रथम-रुपाली राजपूत,
द्वितीय-शितल सोनार,
तृतीय-मनिषा गवते.मोठा गट(वयोगट 51 च्या पुढे)
प्रथम-विद्या हजारे,द्वितीय -मंजू कोठारी.नाट्य स्पर्धा प्रथम-टाइमपास,द्वितीय-स्त्री शक्तीचा जागर.परस बाग स्पर्धा-कल्पना पाटील,मीनल पाटील,पद्मिनी भावसार,राजश्री नेरकर,डॉ लीना चौधरी,सुनीता क्षीरसागर, वैशाली पाटील.पोत्यात पाय घालून चालणे-स्नेहा पहाडे,बबिता भिल,माधुरी पाटील,वैशाली देशमुख.पाककला-मोहिनी कुळकर्णी, लता दुसाने,स्नेहा पहाडे,प्रियंका कोळी.गीता वाचन-मीना बाई,पुष्पा सोनी,संध्या भुतडा,वैशाली भांडारकर, शितल सोनार,सुनिता करंजे.जाहिरात स्पर्धा-सौंदर्य आरशात नाही,ऑनलाइन पेक्षा ऑफलाईन,इंदिरा आयव्हीएफ सेंटर,बदाम,ग्राईफ वॉटर,निरमा ऍडव्हान्स,योगाचे महत्व.
महोत्सवासाठी नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर,मुख्याधिकारी गणेश शिंदे, महिला मंच ट्रस्ट अध्यक्ष डॉ.अपर्णा मुठे,उपाध्यक्ष सौ. तिलोत्तमा पाटील,सचिव सरोज भांडारकर,कोषाध्यक्ष कांचन शहा तसेच श्रीमती भारती गाला, सौ. पद्मजा पाटील, सौ. वसुंधरा लांडगे, सौ. विजया देसर्डा, सौ. उज्वला शिरोळे, सौ, करुणा सोनार, डॉ.प्रा. सौ. रंजना देशमुख, प्रा. सौ. शीला पाटील, सौ. विद्या हजारे, श्रीमती माधुरी पाटील यांनी परिश्रम घेतले.




