
अमळनेर:-श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज कुणबी पाटील समाज बहुउद्देशिय मंडळ, अमळनेरच्या वतीने कुणबी पाटील समाज महिला परिचय मेळावा आणि राजमाता जिजाऊ जयंती निमीत्ताने सालाबादा प्रमाणे हळदी कुंकुचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
समाजातील महिलांचा परिचय व्हावा व पुढील कार्यक्रमास वाटचाल मिळावी या उद्देशाने हा महीला परिचय मेळावा आयोजीत करण्यात आला होता.टाऊन हॉल, लोकमान्य शाळे समोर, अमळनेर येथे हा कार्यक्रम पार पडला. पाटील समाजातील नगरपरिषदेत निवडुन आलेल्या महिला नगरसेविकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच महिलांचे हळदी कुंकू व वाण वाटप कार्यक्रम देखील पार पडला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुणबी पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष शेखर लोटन पाटील व सर्व पंच मंडळ सदस्य आणि महिला मंडळाने परिश्रम घेतले.




