
अमळनेर : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर प्रशासकीय घडामोडींना वेग आला असून, विविध समित्यांच्या सदस्यसंख्येबाबतचर्चा करणे,उपाध्यक्ष कोणत्या समितीचे पदसिद्ध सभापती असतील हे ठरविणे, विविध समित्याची नावे गटनेत्यांनी पिठासन अधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर करणे, पिठासन अधिकारी यांनी गटनेत्यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून चर्चा करणे या संदर्भात बैठकीत निश्चित करण्यात आला.
पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले सभागृहात ही महत्त्वपूर्ण सभा पार पडली. सुरवातीला बैठकीत शिवसेना गटाकडून १० तर अमळनेर शहर विकास आघाडीकडून ११ सदस्यांची मागणी करण्यात आली होती. तसेच अपक्ष गट यांच्यात व गटनेत्यांमध्ये एकमत न झाल्याने पिठासन अधिकाऱ्यांनी १९६५ च्या कलमाधारे १२ सदस्य निश्चित केल्याचा निर्णय सभागृहात जाहीर झाला.
त्यानुसार शिवसेना गटाला ५, अमळनेर शहर विकास आघाडीला ४, अपक्ष ६ च्या गटाला २, तर अपक्ष दोन अपक्षच्या गटाला १ असे सदस्य नामनिर्देशन करता आले.
यावेळी उपनगराध्यक्ष यांना नियोजन व विकास समितीचे पदसिद्ध सभापती म्हणून नियुक्त करण्यात आले. तसेच विविध गटनेत्यांशी चर्चा करून खालील समित्यांसाठी सदस्यांचे नामनिर्देशन करण्यात आले.
१) बांधकाम समिती सदस्य–
साहेबराव पवार, रुपाली शिवदे, मोहन सातपुते, सुयोग धनगर, पुष्पा पंकज भोई, सचिन कासार, शेख जुबेदाबी नसीरोद्दीन, जयश्री पाटील, सचिन बळवंत पाटील, कल्पना परदेशी, महेश देशमुख, प्रविण पाटील
२) शिक्षण समिती सदस्य
शेख नाविद शे. मुशीरोद्दीन, पंकज चौधरी, सविता संदानशिव, सुवर्णा हटकर, अपूर्वा चौधरी, कविता राजपूत, अपुसाना मुक्तार खाटीक, सचिन पाटील, कल्पना परदेशी, प्रताप साळी, योगिता कापडणेकर
३) आरोग्य समिती सदस्य
सविता संदानशिव, गुलाब पाटील, पंकज चौधरी, सुयोग धनगर, श्रीराम चौधरी, देवेंद्र कांबळे, शोभाबाई गढरे, नंदा संदानशिव, सचिन पाटील, रामकृष्ण पाटील, नीलिमा पाटील, प्रविण पाटील
४) पाणीपुरवठा समिती सदस्य
कैलास पाटील, मोहन सातपुते, पंकज चौधरी, पुष्पा पंकज मोरे, सुयोग धनगर, देवेंद्र कांबळे, जयश्री पाटील, डिगंबर महाले, विजय कहारु पाटील, नीलिमा पाटील, छाया पाटील, प्रविण पाटील
५) नियोजन व विकास समिती सदस्य
श्रीराम चौधरी, दीपक चौगुले, कल्पना शर्मा, पुष्पा पंकज भोई, गुलाब पाटील, शोभाबाई गढरे, सचिन कासार, नंदा संदानशिव, विजय कहारु पाटील, महेश देशमुख, प्रताप साळी, योगिता कापडणेकर
६) महिला व बाल कल्याण समिती सदस्य
कल्पना शर्मा, पुष्पा पंकज भोई, रुपाली शिवदे, तडवी इर्शाद सुनिल, योगिता संदानशिव, कविता राजपूत, अपुसाना मुक्तार खाटीक, नंदा संदानशिव, स्वप्ना विक्रांत पाटील,स्वाती परदेशी, छाया पाटील, योगिता कापडणेकर
या सर्व समित्यावर सर्व गटाचे सदस्य असतील. या सर्व समित्यांच्या सभापतींची निवड आणि स्थायी समिती सभापती निवड यासाठी १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता क्रांती सूर्य महात्मा जोतिबा फुले सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये या निवडीबाबत मोठी उत्सुकता असून सर्वांचे लक्ष त्या दिवशीच्या निर्णयाकडे लागले आहे.
आजच्या सभेचे कामकाज पिठासन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले. त्यांना मुख्याधिकारी गणेश शिंदे, नायब तहसीलदार प्रशांत धमके, तसेच रवींद्र चव्हाण, विनोद पाटील, प्रमोद लटपटे यांनी मदत केली. संपूर्ण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
नवीन समित्यांच्या स्थापनेमुळे शहरातील विविध विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. आगामी काळात महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीला नवचैतन्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.




