
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथे दुकानाच्या बाहेर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना ११ रोजी उघडकीस आली आहे.
अमळगाव येथील नितीन चंद्रशेखर पाटील यांच्या मालकीची यामाहा एमटी १५ ही ८० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एमएच १९ इएच ८९३१ ही १० रोजी त्याच्या मालकीच्या हॉटेल शिवबा हॉटेलच्या बाहेर लावून त्याचा भाऊ हा दुकानात झोपला. मात्र सकाळी उठून पाहिले असता त्याला दुचाकी दिसून आली नाही. नितीन व त्याच्या भावाने आजुबाजूच्या परिसरात शोध घेतला मात्र आजपावतो कोणताही तपास न लागल्याने अखेर त्यांनी मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल केली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




