
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २४ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी दुपारी ३.३० वाजता उघडकीस आली आहे.
अंतुर्ली येथील प्रशांत भाईदास पाटील (वय २५) हा पुणे येथे कंपनीत नोकरीस होता.आठवड्याभरापासून तो गावी आलेला होता.२० रोजी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या दरम्यान गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.त्याने मोबाईल वर ठेवलेल्या स्टेटसच्या आधारावर त्याच्या मित्रांना व शेजाऱ्यांना घटनेचा उलगडा झाला. घराचा दरवाजा तोडून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
प्रशांत चे आई वडील काही कामासाठी बाहेरगावी गेल्याने तो घरी एकटाच होता. प्रशांत ने प्रिंटिंग डिप्लोमा चे शिक्षण घेतलेले होते.त्याचा मोठा भाऊ मुंबई येथील कंपनीत कामाला आहे.प्रशांत चे वडील शेती करतात.गावातील होतकरू तरुणाने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




