
अमळनेर:- केंद्र व राज्य सरकार घरकुल योजने अंतर्गत लाभार्थ्यांचे शासकीय अनुदान,विधवा परीतक्ता ज्येष्ठ महिला व पुरुष यांच्यासाठी शासनाने सुरु केलेल्या योजना उदा. संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी योजना,
शेतकऱ्यांना झालेल्या पिक नुकसान नुकसानभरपाई पोटी शासनाने पिक विमा का दिला नाही.तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदानाचे शासनाने दिलेले अनुदान का मिळत नाही याबाबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारीना निवेदन देण्यात आले.
यात म्हटले आहे की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे नांव बदलून केंद्र शासनाने जीरामजी योजना सुरु केलेली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहीर- २७३ गोठा शेड- १४८, शोष खड्डा-२७, घरकुल ३८१७ सदर लाभार्थ्यांना कुशल कामासाठी व अकुशल कामासाठी मजुरीचे अनुदान वेळेत का पूर्ण मिळाले नाही. तो लाभ मिळाला पाहिजे. संजय गांधी योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी या योजनेच्या हजारो लाभार्थ्यांना DBTच्या नावांखाली हजारो त्यांच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. त्यांना सदर योजनेचा तात्काळ लाभ मिळावा.सदर हे सर्व लाभार्थी शेत मजूर वर्ग असून त्यांना लाभापासून वंचित ठेवल्यामुळे त्यांना सदरचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने त्यांना तात्काळ लाभ मिळावा अशी विनंती यात करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर जिल्हाध्यक्ष शरद पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील,उपाध्यक्ष दिलीप पाटील यासह अनेकांच्या सह्या आहेत.




