
अमळनेर : न्यायालयाने मनाई हुकूम दिला असताना देखील बांधकाम करत असल्याने त्याला विरोध करायला गेलेल्या कुटुंबाला सात जणांनी लोखंडी सळई आणि चाकूने मारहाण करून जखमी केल्याची घटना १६ रोजी सकाळी साडे आठ वाजेला सारबेटा येथे घडली.
गुलाम हुसेनखा मेवाती (वय ६९ रा सारबेटे बुद्रुक) यांनी फिर्याद दिली की १६ रोजी सकाळी वकिलखा अमिरखा मेवाती, शकिलखा अमिरखा मेवाती, जमिलखा अमिरखा मेवाती, जुनेदखा वकिलखा मेवाती, फारूखखा नसीबखा मेवाती, नसीबखा अमिरखा मेवाती यांनी मिळकत नंबर २५२/२ वर बांधकाम सुरू केले. म्हणून पत्नी जाकीराबी गुलाम मेवाती ही या मिळकतीवर न्यायालयाचा मनाई हुकूम आहे तुम्ही बांधकाम करू नका असे बोलायला गेली असता त्यावेळी वकिलखा याने तिला शिवीगाळ व धक्काबुक्की करून खाली पाडले आणि शकिलखा याने हातातील सळईने उजव्या मांडीवर मारले.पत्नीला आवरायला गुलाम गेला असता नसीबखा यांनी गच्ची पकडून धरून ठेवले आणि जमिलखा याने लोखंडी सळईने डोक्यावर, पायावर, कमरेवर, हातावर पायावर मारायला सुरुवात केली. जुनेदखा याने पोटात चाकू मारण्याचा प्रयत्न केला असता तो हाताच्या अंगठा ते मनगटापर्यंत लागला. त्यावेळी मुलगा सरफराज आवरायला आला असता वकिलखाने त्याच्या डोक्यावर सळईचा वार केला. तर शकीलखा याने हातातील चाकूने कमरेवार केला. तसेच फारूखखा नसीबखा मेवाती आणि शाहरुखखा नसीबखा मेवाती यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत घर बांधू देत नाही याना मारून टाका अशी धमकी दिली. तिघेही जखमी झाल्याने त्यांना मेमो देऊन ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले मात्र जखम जास्त असल्यांने त्यांना जळगाव येथे शासकीय सर्वोपचार केंद्रात पाठवण्यात आले होते. तेथुन आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला सात जणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१),११५(२) ,१८९(२) , १९१(२),१९१(३) , १९० ,३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करीत आहेत.



