
अमळनेर:- शहरातील राजे शिवाजी मित्र मंडळ, जय हिंद व्यायाम शाळा, व प्रताप शिंपी मित्रपरिवार आयोजित महा कुस्ती मैदान नुकतेच संपन्न झाले. मैदान सुरू करण्यापूर्वी शहरातील डॉक्टर संदिप जोशी यांच्या हस्ते हनुमंत रायाची आरती संपन्न झाली. त्यानंतर अमळनेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रभाकर नारायण पाटील, मंगळ ग्रह संस्थानाचे अध्यक्ष नगरसेवक डीगंबर महाले, खानदेश शिक्षक मंडळाचे चेअरमन निरज अग्रवाल, नगरसेवक भरत ललवाणी, अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, विजु बाविस्कर, गोपाल पाटील, माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, नगरसेवक प्रताप साळी, माजी नगरसेवक बिरजू लांबोळे, जितेंद्र ठाकूर, मुन्ना शेख, जय हिंद व्यायाम शाळेचे उपाध्यक्ष जिवन पवार, तालुका कुस्ती संघाचे अध्यक्ष बाळू पाटील, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर गणेश ठाकूर, सचिन बुधा पाटील, संजय महाजन, अमोल हिम्मत पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कुस्तीला सुरुवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचा जय हिंद व्यायामशाळा व प्रताप आबा मित्रपरिवार कडून सत्कार करण्यात आला. राजे शिवाजी मित्र मंडळाचे कार्यवाहक जिजाबराव पाटील, जीवन पवार, दीपक चौधरी, पोलीस हवालदार पिंटू अशोक शिंपी, पोलीस हवालदार बबलू पाटील, भैय्यासाहेब पाटील, पवन चौधरी, भैय्या पाटील, विकी पाटील, अमोल चौधरी, विनोद निकम, मधु चौधरी, सोनू पाटील, कुणाल पारधी, नरेंद्र पाटील, दिनकर बडगुजर, श्रीकृष्ण पाटील यांनी परिश्रम घेतले. आयोजक पवन पैलवान यांनी एक लाख साठ हजार रुपयाच्या कुस्त्यांसह विजयी पैलवानांना गदा देण्यात आल्या. पंच म्हणून ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन रावसाहेब आबा पैलवान, संजू आबा पैलवान , माजी नगरसेवक प्रताप आबा पैलवान यांनी काम पाहिले तर कुस्ती समालोचक म्हणून प्रवीण महाराज पैलवान, आणि निजामपूरचे शरद भाऊ सूर्यवंशी यांनी काम पाहिले. हा दंगल यशस्वी करण्यासाठी राजे शिवाजी मित्र मंडळ जय हिंद व्यायाम शाळेतील सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.




