
अमळनेर:- तालुक्यातील वावडे येथे अज्ञात चोरट्यांनी पाच घरे फोडून १ लाख ५५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना २१ रोजी उघडकीस आली आहे.
फिर्यादी देविदास बारकु पाटील (रा. वावडे हमु चोपडा) हे बीएसएफ मध्ये कार्यरत असून पंधरा दिवसाच्या सुट्टीवर घरी आले होते. वावडे येथे घरी त्याचे आई व वडील असे दोघेजन राहात असुन वडील शेती व्यवसाय करुन त्यावर उदरनिर्वाह करतात. मात्र फिर्यादीचे आई वडील हे माझ्या नातेवाईकांचे ऑपरेशन झालेले असल्याने ते गलवाडे ता. चोपडा येथे एक महिन्यापासून गेले होते.
दिनांक २१ रोजी फिर्यादी घरी असतांना सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या वावडे येथील घराचा काडीकोंडा तोडल्याचा निरोप मिळाल्याने फिर्यादी तत्काळ घरी आले. तेव्हा मला आमचे रहाते घराचे कडीकोंडा कुलुप तोडलेले दिसुन आले. तसेच कपाटातील सोन्याच्या वस्तु (30 ग्रॅमची पोत) व रोख पैसे चेक केले असता ते तेथे मिळुन आले नाही. तसेच गल्लीतील राहणारे राजेंद्र पुंडलीक पाटील, दिनेश मच्छींद्र पाटील, प्रदिप तोरण पाटील, रतीलाल अमृत पाटील सर्व रा. वावडे ता. अमळनेर अशांचे घरांचे कुलुप कडीकोंडा तोडलेला आहे. व त्यांचे घरात देखील सोन्याचांदीचे गाडीने व रोख रक्कम चोरीस गेल्याची माहिती मिळाली. तसेच गावातील जितेंद्र रमेश वैष्णव व अरुण ढोमण पाटील या दोन लोकाचे घराचे कुलुप कडीकोंडा तोडलेला आहे. मात्र घरातील कोणतीही वस्तु चोरीस गेलेली नाही. फिर्यादीच्या घरातील 30 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व 25000/- रुपये रोख, राजेंद्र पुंडलीक पाटील यांच्या घरातील 25000/- रुपये रोख, दिनेश मच्छींद्र पाटील यांचे घरातील ६ हजाराचे दागिने व २० हजार रुपये रोख , प्रदिप तोरण पाटील यांचे घरातील 5 ग्रॅम ची सोन्याची पोत व 17000/- रुपये रोख, रतीलाल अमृत पाटील यांचे घरातील 5 ग्रॅम वजनाचे टोंगल, 1 ग्रॅम, अर्धा ग्रॅम वजनाचे 2 अंगठ्या व 15 भार चांदी दागीणे असे एकूण १ लाख ५५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ दिनेश पाटील हे करीत आहेत. घटनास्थळी एपीआय जीभाऊ पाटील, जळगाव एलसीबी टीममधील संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, श्वान पथक, फिंगरप्रिंट पथक, फॉरेन्सिक टीम यांनी हजेरी लावत पाहणी केली.




