
पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड, प्रा. अनिल बोरसे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम…
अमळनेर:- विद्यार्थ्यांनी केवळ वर्गात बसून पुस्तकी ज्ञान मिळवू नये, तर त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर होतो हे अनुभवावे, या उद्देशाने प्रा. अनिल बोरसे यांनी अमळनेर फार्मसी कॉलेजच्या पदविका विभागासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला. स्थानिक जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांनी विज्ञानातील क्लिष्ट प्रक्रिया प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. गणेश शिंगारे यांनी विद्यार्थ्यांना जलशुद्धीकरण केंद्रा बद्दल मार्गदर्शन केले. प्रा. अनिल बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे देखील आयोजन केले होते. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.देवेश भावसार, प्रा.शिवानी शर्मा, प्रा.हर्षदा पवार, प्रा.मानसी उपासनी, प्रा.प्रियांका महाजन, प्रा.वैशाली कुलकर्णी व श्री.ज्ञानेश्वर चौधरी, श्री. जगदीश सोनवणे, श्री.महेश सोनजे उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल चेअरमन प्रदीप अग्रवाल व प्राचार्य प्रा.डाॅ.रविन्द्र सोनवणे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृन्द तसेच विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.




