
योगेश पवार याच्याविरुद्ध फसवणुकीचा व कागदपत्रात फेरफार केल्याचा गुन्हा दाखल...
अमळनेर : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा बनावट निलंबन आदेश तयार करून गटविकास अधिकारी आणि जिप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार १३ जून रोजी उघडकीस आला आहे. योगेश पवार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा कागदपत्रात फेरफार चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश मोहन पवार रा पैलाड यांनी कुऱ्हे बुद्रुक व कुऱ्हे खुर्द येथील ग्रापमपंचायत अधिकारी संगीता अशोक चौधरी विरुद्ध १३ फेब्रुवारी व १८ फेब्रुवारी २०२५ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर विस्तार अधिकारी सुरेश कठळे यांनी चौकशी केली होती. त्यांनतर संगीता चौधरी याना नोटीस देऊन खुलासा ही मागवण्यात आला होता. यापूर्वी योगेश पवार याने विविध माहितीचे अधिकारात अर्ज टाकल्याने त्यांना उत्तर देताना गटविकास अधिकऱ्यांच्या सह्यांचे अनेक पत्र आहेत. विस्तार अधिकारी सुरेश कठळे यांनी चौकशी करून अभिप्राय व अहवाल सादर केला होता. त्यात संगीता चौधरी यांच्या निलंबनाचा कुठलाही आदेश नव्हता. मात्र योगेश मोहन पवार यांनी पंचायत समितीचे बोध चिन्ह व शिक्का वापरून गटविकास अधिकारी यांची स्वाक्षरी स्कॅन करून संगीता चौधरी यांचा निलंबन आदेश तयार केला आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लक्षवेध म्हणून ११ जून रोजीचा तक्रार अर्ज सह बनावट आदेश १३ जून रोजी सादर केला. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी १४ जून रोजी त्यावर व्हाट्सएप ने सूचना गटविकास अधिकाऱ्यांना दिल्याने खरा प्रकार उघडकीस आला. योगेश पवार याने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांची फसवणूक केली म्हणून गटविकास अधिकारी एन आर पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला योगेश पवार यांच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता ३१८(२) ,३३६(३),३३६(४) ,३४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत.




