
अमळनेर(प्रतिनिधी): उत्तरप्रदेशातील वाराणशी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या हस्ते बांधण्यात आलेला माणिकर्णिका घाट उत्तरप्रदेश सरकारने बुलडोझर लाऊन पाडल्याच्या घटनेचा धनगर समाज तसेच इतर समाजाच्या नागरिकांतर्फे निषेध व्यक्त करत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात अनेक ऐतिहासिक तसेच धार्मिक वास्तूंची उभारणी केली असून यात प्रामुख्याने रस्ते, विहिरी, कालवे,धरणे,धर्मशाळा उभारल्या.या वास्तूंमुळे देशातील सर्व समाजाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे.सरकारने पुरातत्व खात्यामार्फत या ऐतिहासिक वास्तू जपणे महत्वाचे आहे मात्र सरकार या वास्तूंवर बुलडोझर फिरवून महान पुरुषांच्या ऐतिहासिक खुणा पुसण्याचे काम करत असून हे निंदनीय असल्याचे सांगत सर्व समाजातील नागरिकांनी निवेदनातून निषेध व्यक्त केला आहे
यावेळी भागवत सूर्यवंशी,संदीप घोरपडे,बन्सीलाल भागवत,शरद पाटील,गजेंद्र साळुंखे,एस.सी.तेले,जयदीप सिसोदिया,विष्णू पाटील,राजेंद्र पाटील,किशोर पवार,भानुदास सैंदाने, महेश पाटील,देवा लांडगे,रियाज मौलाना,शाम पवार,नितीन निळे,अशोक पवार तसेच सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते.




