
अमळनेर:- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर चिमणपुरी पिंपळे येथे दि. २४ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा उद्घाटन सोहळा दि. २४ जानेवारी रोजी श्री गुरुदत्त मंदिर सभागृहात उत्साहात पार पडला.
उद्घाटन श्री. निंबा दला चौधरी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख उपक्रमांतून व्यक्तिमत्त्व विकास साधावा तसेच पर्यावरण संवर्धन, जलसंधारण व ग्रामस्वच्छतेसाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. संदीप बी. नेरकर (सिनेट सदस्य) यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या ‘NOT ME BUT YOU’ या ब्रीदवाक्याचा अर्थ स्पष्ट करत स्वयंसेवकांनी निस्वार्थ भावनेने सामाजिक बांधिलकी जपावी, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. हेमंत पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुनील राजपूत यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. वैशाली राठोड यांनी मानले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. वर्षा युवराज पाटील, संतोष चौधरी सदस्य,सामाजिक कार्यकर्ते युवराज दगा पाटील, नारायण दामू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय ग्रामस्थ, मान्यवर, शिक्षकवृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी-स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिरामुळे ग्रामीण विकासास चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘वंदे मातरम्’ गीताने झाली




