
अमळनेर – शहरातील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेले नवीन मराठी शाळेचे स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण, आनंदी व चैतन्यमय वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व उपक्रमशीलतेला वाव देणारे हे स्नेहसंमेलन पालक, शिक्षक व नागरिकांच्या उपस्थितीमुळे अधिकच रंगतदार ठरले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील हे होते. तर श्री डॉ. पंकज संतोष महाजन व डॉ. सौ हर्षदा पंकज महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली.
यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. डी. डी. पाटील, लोकमान्य विद्यालयाचे शाळा समिती चेअरमन प्रा. डॉ. पी. जे. जोशी, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक अतुल भोई, लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. के. चौधरी, तसेच बाल विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका अनिता वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापक पदी अतुल भोई सर यांचे नियुक्ती झाल्याने संस्थेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला तसेच लोकमान्य विद्यालयाचे चेअरमन प्रा.डॉ. प्रभाकर जोशी सर यांना सूर्योदय जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला व नवीन मराठी शाळेचे ज्येष्ठ उपशिक्षक श्री मकरंद रमेश निळे व जेष्ठ उपशिक्षिका रुपाली अभिषेक पांडे यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले आणि अभ्यासासोबतच कला जोपासणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले त्यात
नृत्य आविष्कार सामाजिक नाटिका ऐतिहासिक नाटिका लोककला अशा विविध कलागुणांनी संपन्न कार्यक्रम एकापेक्षा एक बहारदार सादर केले.विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे, कौशल्याचे व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविले. पालक व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नृत्य पर स्वागत गीत सादर केले गेले. नवीन मराठी शाळेचे उपशिक्षक संदीप सिसोदे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला नवीन मराठी शाळेचे उपशिक्षक उज्वल मार्कंडेय यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह व सकारात्मक ऊर्जेचे वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावी व सुस्पष्ट अशा आवाजात नवीन मराठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. रुपाली अभिषेक पांडे व श्रीमती प्रतिभा प्रमोद पाटील यांनी केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाल्याने शिक्षणासोबतच आनंद, आत्मविश्वास व सहकार्याचे महत्त्व अधोरेखित झाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. शेवटी आभार उज्वल मार्कंडेय यांनी मानले




