
अमळनेर:- नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.16 मधील शाहू नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध असलेल्या इलेक्ट्रिक पोल हटवून रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला आहे.
नगरसेविका सौ.निलीमा रवि पाटील यांनी पाठपुरावा करून सहाय्यक अभियंता हितेंद्र बढे यांच्या सहकार्याने रस्त्याच्या मधोमध असलेला नागरिकांना अडसर ठरणारा इलेक्ट्रिक पोल रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला. यावेळी रवि पाटील सोबत कपील पाटील, विलास पवार, विजय शिसोदे, कुवर सर, चौधरी सुर, देसले सर, अशोक सोनार, किशोर सैंदाणे, कल्पेश सांळुखे, विजय वाणी, कविष पाटील, अमित सोनार, मोहीत पवार सागर विसपुते, बापु सोनार, भरत ठेकेदार, चेतन पवार, भैय्या ठेकेदार आदींचे सहकार्य लाभले.




