
तीन दिवसीय महोत्सवाचे केले आयोजन
अमळनेर:-येथील न्यू प्लॉट भागातील शितलनाथ जैन संस्थानच्या मंदिराचा आज दिनांक 30 जानेवारी रोजी 50 वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने दिनांक 28 पासून तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी 7 वाजता महिला भगिनींची प्रभात फेरी,8 वाजता अन्नपूर्णा मंगल कार्यालयात नवकारसी,9 वाजता शितलनाथ मंदिरात श्री सत्तरभेदी महापूजा (संगीतकार,वासुपुज्य मंडळ,अमळनेर ),दुपारी 12.30 ते 3 पर्यंत अन्नपूर्णा मंगल कार्यालयात तिन्ही संघांचे स्वामीवात्सल्य आदी कार्यक्रम होणार आहेत.याचे मुख्य लाभार्थी धनलक्ष्मीबेन जसवंतलाल सेठ परिवार तर सह लाभार्थी श्री शितलनाथ जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ व श्रीमती विमलाबेन भगवानजीभाई मशकारिया परिवार असून सायंकाळी 7.15 वाजता श्री कुमालपाल महाराजांची आरती होणार आहे.
तसेच दिनांक 28 व 29 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमही उत्साहात पार पडले.तरी सर्व जैन समाज बांधवांनी यावेळी सहपरिवार उपस्थिती द्यावी असे आवाहन श्री शितलनाथ मन्दिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.




