
अमळनेर (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ शहरातील हिंदी सेवा मंडळ संचलित.र .न मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे उपशिक्षक अमित विजय चौधरी यांची तर उपाध्यक्ष पदी अमळनेर येथील साने गुरुजी प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे स्वप्निल वसंतराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. जळगाव येथे शनिवारी पतसंस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर आर पाटील यांनी कामकाज पाहिले निवडी नंतर नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे संचालक मंडळाने अभिनंदन केले
यावेळी पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक प्रसन्ना बोरोले,सलीम तडवी, गोविंदा लोखंडे,आशिष पवार,संतोष मराठे, प्रशांत साखरे, सुनील पवार रूपाली पाटील ,गणेश लोडते ,प्रफुल्ल सरोदे,वना महाजन,राकेश पाटील, धनंजय काकडे, अविनाश घुगे , महेंद्र रामोसे, मोहन पालवे उपस्थित होते, या निवडीमुळे अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे




