
सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी २८ ला जीवनाची वेळ पाळली नाही- आ. अनिल पाटील…
अमळनेर :-सतत वेळ पाळणाऱ्या अजितदादांनी २८ ला जीवनाची वेळ पाळली नाही. संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारे कार्य नियतीने केले आता आम्ही कोणाकडे बघायचे. २०१६ मध्ये माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. मी भाजप चा असताना देखील त्यावेळी दादांनी पाठीवर हात ठेवला नसता तर कदाचित मी आत्महत्या करण्याच्या तयारीत होतो अशा शब्दात ऋण व्यक्त करत आमदार अनिल पाटील यांनी सर्व पक्षीय शोक सभेत श्रद्धांजली अर्पण केली.
अमळनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार याना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी १ रोजी सकाळी ९ वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार अनिल पाटील पुढे म्हणाले की अमळनेर तालुक्यात होणारा विकास कायापालट यात अजितदादांचा मोठा वाटा आहे. आपल्या आमदारांच्या समस्या ऐकून प्रत्येकाला भावाप्रमाणे वागणूक देऊन न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले की पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला गती देऊन झालेला आजचा पाणीसाठा अजितदादांची देण आहे. माजी आमदार डॉ बी एस पाटील , नगराध्यक्ष डॉ परिक्षित बाविस्कर , जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील , भैरवी पलांडे , डॉ अविनाश जोशी , संजय पुनाजी पाटील ,संदीप घोरपडे , डी एम पाटील , शिवाजी पाटील , बी के सूर्यवंशी , मनोज पाटील , भागवत पाटील , डी एम पाटील , खा शि मंडळ चेअरमन निरज अग्रवाल , वसुंधरा लांडगे , माजी सभापती डॉ दीपक पाटील ,सरपंच संघटनेतर्फे महेंद्र बोरसे , ऍड शकील काझी ,ऍड तिलोत्तमा पाटील , मंगळ ग्रह मंदिर तर्फे दिलीप बहिरम , आम आदमी पार्टी तर्फे प्रा गणेश पवार , नितीन भदाणे ,इम्रान खाटिक , रिपाई तर्फे यशवंत बैसाणे , शिवसेना तर्फे महेश देशमुख ,अनिल शिसोदे, मुन्ना शर्मा, अमित पाटील ,प्रा योगिता कापडणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले.
शोकसभेचे आयोजन मराठा समाजाचे विक्रांत पाटील , संजय पाटील , भाजपचे शीतल देशमुख ,उमेश वाल्हे , पत्रकार संघाचे चेतन राजपूत ,जितेंद्र ठाकूर , राष्ट्रवादीचे भूषण भदाणे ,शेतकी संघाचे संजय पाटील तसेच सर्व पक्षाच्या व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , बिपीन पाटील , ऍड ललिता पाटील , सुलोचना वाघ , रिटा बाविस्कर , माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम ,सुषमा देसले ,प्रा अशोक पवार , मुक्तार खाटीक ,राजेंद्र देशमुख , श्याम पाटील , हेमंत पवार दाऊदी बोहरा समाज ,न पा अधिकारी ,कर्मचारी संघटना , जिल्हा बँक कर्मचारी ,खा शि मंडळ , भाजप ,सेना ,काँग्रेस , राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी ,शिक्षक संघटना ,व्यापारी , कामगार , काच माळी समाज , मराठा समाज , कुणबी पाटील संघटना , ग्रामसेवक संघटना , पत्रकार संघटना , मराठा समाज महिला मंडळ ,सावित्रीबाई महिला मंडळ ,महिला मंच , रेशन दुकानदार संघटना ,पोलीस पाटील ,बाजार समिती आदी क्षेत्रातील नागरिक हजर होते.




