
अमळनेर :- राज्यातील गुणवत्ता आश्वासनात्मक अंतर्गत राज्यस्तरीय मूल्यमापनात तालुक्यातील जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास उल्लेखनीय कामगिरी करत गुणवत्ता निकष पूर्ण केल्याने त्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे.
यात राज्यातील ७१ आरोग्य केंद्राचे मूल्यमापन करण्यात आले होते. यात जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने गुणवत्ता निकष पूर्ण करत ८७.९८ टक्के गुण प्राप्त करत राज्यस्तरीय NQAS प्रमाणपत्रासाठी पात्रता प्रात केली आहे.आरोग्य केंद्राचे बळकटीकरण आणि आश्वासक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल अग्रवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली जानवे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय रनाळकर, डॉ. रिया शिसोदे, व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेद्रांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.




