
अमळनेर:- तालुक्यातील धार शिवारात निर्जनस्थळी मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका २४ वर्षीय भिक्षेकरी विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला मध्य प्रदेशातील असून, तिला जेवण व पैशाचे आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत एका नराधमाने अत्याचार केला. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ॲट्रॉसिटीसह बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पीडित विवाहित महिला (वय २४ वर्षे) ही मूळची लालबाग बऱ्हाणपूर, मध्य प्रदेशातील रहिवासी असून पती मयत झाल्याने ती सध्या रेल्वेत भिक्षा मागून उदरनिर्वाह करते. तिला मदतीचे बहाण्याने आरोपी आकिबखान गफ्फारखान हा जेवण व पैसे देत असे त्यातून झालेल्या ओळखीतून आरोपीने फिरण्याच्या बहाण्याने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास धार जवळच निर्जनस्थळी एका झोपडीत ती एकटी असताना, संशयित आरोपी आकीबखान गफ्फारखान (रा. अमळनेर) याने तिला गाठले. पीडित महिला ही तिथे एकटीच आहे, याची माहिती असतानाही आरोपीने तिला विविध आमिषे दाखवली. तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
पीडितेने या घटनेनंतर पीडित महिलेने तात्काळ मारवड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून मारवड पोलिसांनी आकीबखान गफ्फारखान राहणार कसाई मोहल्ला, अंमळनेर या आरोपीविरुद्ध बलात्कार व अट्रॉसिटी या गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक बाजीराव कोते यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते करत आहेत. त्यांच्यासोबत मारवड पोलीस ठाण्याचे सपोनि जिभाऊ तुकाराम पाटील हे तपासात सहकार्य करत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, मात्र पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



