
अमळनेर पोलिसांची भल्या पहाटे कारवाई…
अमळनेर : तालुक्यातील गडखांब शिवारात पोलिसांनी धाड टाकून गांजाचे एक बिघा क्षेत्र उध्वस्त केले असून ओला व सुका गांजा पकडला आहे. सुरेश लोटन पाटील असे शेतकऱ्यांचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना गोपनीय माहिती मिळाली की गडखांब शिवारात गट नंबर २३२४ मध्ये एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केला आहे. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा याना पंचनाम्यासाठी घेऊन पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ ,पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर , हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार , विनोद संदानशिव ,प्रशांत पाटील निलेश मोरे , नितीन मनोरे ,सुनील तेली , विनोद सोनवणे , राहुल पाटील ,उदय बोरसे , सिद्धांत शिसोदे , गणेश पाटील ,संजय सोनवणे , गणेश पाटील , श्यामल पारधी ,निलेश पाटील , विनोद पाटील यांना घेऊन ७ रोजी सकाळी ६ वाजता छापा टाकला. गडखांब येथील सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याने मका सोबत शेतात गांजा लावलेला आढळून आला. सुमारे सहा फूट उंचीची झाडे उगवलेली होती. शेतकऱ्याने शेतात पाच ते सात गोण्या ओला गांजा बांधून ठेवलेला दिसून आला. तसेच एका ठिकाणी गांजा वाळवायला ठेवलेला दिसला. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांने गांजा विकल्याचे देखील कबुल केले. फॉरेन्सिक पथकाने देखील पंचनामा सुरू केला. कायदेशीर प्रक्रिया झाल्यानन्तर सर्व झाडे उपटवून मुद्देमाल जप्त करण्यात येणार आहे.




