
अमळनेर धरणगाव रस्त्यावरील घटना, पोलिसांत गुन्हा दाखल…
अमळनेर:- अमळनेर ते धरणगाव रस्त्यावर चारचाकीच्या जबर धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ९ रोजी घडली असून याप्रकरणी चारचाकी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
९ रोजी नरेंद्र राजू चव्हाण (वय ३९ रा. धरणगाव) व विश्वास रोहिदास सोनवणे (वय ४१ रा. भाडणे ता. साक्री) हे दोघे दुचाकी क्रमांक एमएच १९ बिडी ६६७९ हिने धरणगावकडे जात असताना संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास धरणगाव रोडवरील बुलढाणा अर्बनच्या गोडाऊनजवळ समोरून येणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच ३९ एडी ३११९) या वाहनचालकाने भरधाव वेगाने समोरून धडक दिली. त्यात दोघे गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने अमोल राजू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक नामदेव बोरकर हे करीत आहेत




