
एका व्यावसायिकाचे 73 लाख लंपास करून दुबईत पसार?
अमळनेर:-नाशिक शहरातील शरणपूर रोडवरील व्यावसायिक संकुलात ‘अंजनेय ज्योतिष’ नावाने अमळनेर येथील एकाने कार्यालय थाटून भविष्य सांगण्याच्या दाव्यातून नागरिकांना स्वतः मार्फत शेअर्समध्ये गुंतवणुकीचे सल्ले देत लाखो रुपयांसह कथित ज्योतिषी दुबईत पसार झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
नाशिकच्या एका व्यावसायिकाने कर्ज काढत ७३ लाख रुपये गुंतविल्यानंतर मूळ रक्कम किंवा नफा न मिळाल्याने हे बिंग फुटले. भविष्य सांगण्याच्या बहाण्यातून लुटीचा धंदा करणारा संशयित सचिन देशमुख याच्याविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तो मूळचा अमळनेर येथील रहिवासी आहे.नाशिक शहरातील एका किराणा व्यावसायिकाने पोलिसांत फिर्याद दिली असून, कौटुंबिक व्यावसायिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तो संशयित देशमुखच्या कार्यालयात गेला होता. देशमुखने सांगितलेल्या
उपायांनुसार काहीसा फायदा झाल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला. देशमुख गुरूजी नावाने ‘हायप्रोफाइल’ व्यक्तींमध्ये असलेल्या संशयिताच्या सांगण्यावरून व्यावसायिकाने ६६६ शेअर बाजारात मोठी गुंतवणूक केली.’ग्रह-तारे आणि भविष्य’ या भोवती गुंतवणुकीचे फासे फिरवत संशयिताने मोठ्या परताव्याचा दावा केला. त्यानुसार कर्ज काढत व्यावसायिकाने एक एप्रिल २०२५ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७३ लाख रुपये गुंतवले. मात्र, काही ( महिन्यांनी व्यवहार थांबले आणि संशयित कार्यालयाला कुलूप ठोकत पसार झाला.त्यामुळे व्यावसायिकाने पोलिसांत धाव घेत त्यामुळे तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे तपास करीत आहेत.
पोलिस तपासातून पुढे आलेल्या बाबी,,
संशयित देशमुख मूळ जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी शरणपूर रोड परिसरात देशमुखने ‘अंजनेय ज्योतिष केंद्र’ सुरू केले.नाशिक शहरातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांना संशयिताच्या केंद्रामार्फत यापूर्वी प्रायोजकत्व द्यायचा. फेसबुकवरून संशयिताची देशभरात प्रसिद्धी होती. नाशिक, दिल्लीसह इतरत्र दौरे त्याचे असायचे.श्री हनुमान प्रसन्न असल्याचा संशयिताचा दावा होता. संशयिताच्या कार्यालयाची झडती घेतल्या. महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप जप्त करण्यात आली.तसेच डिजिटल पुरावे संकलनासह फॉरेन्सिक विश्लेषण सुरू झाले. संशयिताच्या कौटुंबिक माहितीसह मूळ पत्त्याचा शोध सुरू असून संशयित हा केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त असल्याचे कळते.फसवणूक झालेल्या तक्रारदारांनी पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




