
अमळनेर बसस्थानकासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली...
अमळनेर : तालुक्यातील चांदणी कुऱ्हे खुर्द येथील ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवरील सोलर प्लांट मधून ३२ हजार ६०० रुपयांची वायर अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना २५ जानेवारी रोजी रात्री घडली.
ज्ञानेश्वर गणसिंग पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की ग्रामपंचायतीच्या गट नम्बर २९१ मधून सोलर प्लांट ची ३० हजार रुपये किमतीची १५०० मीटर डी सी केबल वायर आणि २ हजार ६०० रुपये किमतीची ९७ मॉडेल वरील जे बी कट वायर अज्ञात चोरट्याने २५ रोजी रात्री ते २६ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान चोरून नेली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.
बसस्थानक समोरून मोटरसायकल चोरी...
त्याचप्रमाणे शाहआलम नगर मधील वासीमबेग असिफबेग मिर्झा यांची मोटरसायकल क्रमांक एम एच १८ एक्स ४९०७ ही ७ फेब्रुवारी रोजी अमळनेर बसस्थानक समोर निलेश मेडिकल जवळ लावली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अमळनेर पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.



