
कपिलेश्वर यात्रोत्सवासाठी 18 फेब्रुवारीपर्यंत जादा बसेस
अमळनेर– येथील रा.प.आगारात महाशिवरात्रीनिमित्त आगार व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवासी बांधवासाठी उपवासाच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
विशेष करून कपिलेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी हा महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.असंख्य भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.यावेळी स्थानक प्रमुख तसेच सर्व कर्मचारी उपस्थित होते. तसेच कपिलेश्वर येथे यात्रोत्सव सुरू असल्याने येथे जाणाऱ्या भाविकांसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आलेल्या असून दिनांक 18 फेब्रुवारी पर्यंत भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केलेले आहे.




