
अमळनेर(प्रतिनिधी):- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष मानावे असे वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष योगेश महाजन , ज्येष्ठ नेते डॉ.अनिल शिंदे ,माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. व्हि. आर. पाटील ,संदीप पाटील ,माजी नगरसेवक श्याम पाटील , लालू सैनानी ,भारती सोनवणे , हिरालाल पाटील , विजय राजपूत , तुळशीराम हटकर , देवा लांडगे , हरचंद लांडगे , विजय पाटील , दीपक पाटील , महेश पाटील , दीपक पवार , भरत परदेशी , हर्षल महाजन , अनिरुद्ध शिसोदे , कुणाल चौधरी , कल्पेश पाटील , शुभम पवार , उज्वल मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




