
अमळनेर : धुळे येथील हॉटेल ओर्चीड येथे १४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या लायन्स रीजन कॉन्फरन्समध्ये लायन्स क्लब ऑफ अमळनेर यांना उत्कृष्ट सेवा कार्य व उल्लेखनीय कामगिरीबद्दल तब्बल १३ ट्रॉफी, मेडल, व प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले. क्लबच्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत ‘उत्कृष्ट क्लब’ म्हणून निवड करण्यात आल्याने सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यावर्षीचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून अवयवदान जनजागृती मोहिमेवर विशेष भर देण्यात आला.अवयव दान पोस्टर प्रकाशन, गणेशोत्सव काळातील जनजागृती अभियान आदी उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश पोहोचविण्यात खुप मदत झाली या उपक्रमाचा परिपाक म्हणून लायन्स सदस्य महावीर पहाडे यांनी आपल्या मातोश्री कांताबेन पहाडे यांचे देहदान जाहीर केले. त्यांच्या या कार्याची सर्व प्रसार माध्यमातून बातमी व जनजागृती झाल्याने आतापर्यंत ८ लोकांनी देहदानासाठी फॉर्म भरल्याची माहिती देण्यात आली. तसेच मुलींमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण शिबिर, वासरे गावातील पूरग्रस्तांना अन्नदान, तसेच बसपास अभावी शिक्षण सोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या साने गुरुजी शाळेतील एका विद्यार्थ्याला वर्षभरासाठी दत्तक घेण्यासारखे उपक्रम राबविण्यात आले. या विविध प्रकल्पांमुळे क्लबला एकूण १३ पुरस्कार प्राप्त झाले.
या प्रसंगी ज्येष्ठ लायन्स सदस्य बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, डॉ. युसूफ पटेल, विनोद अग्रवाल, डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
कॉन्फरन्सला रीजन चेअरमन Ln चेतनभाई बर्दिया, डीजी Ln अश्विनजी बजोरिया, पीडीजी Ln गिरीशभाई शिसोदिया तसेच प्रमुख पाहुणे Ln गिरीशभाई मालपानी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विचुरकर यांच्यासह बजरंग अग्रवाल, योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, एस.डी. भरुचा, प्रदीप जैन, सुनील चौधरी, शेखर धनगर, जितेंद्र जैन, अभिषेक जैन, युसूफ पटेल, हरिओम सोनी, दिनेश मणियार, कमलेश भंडारी,प्रकाश जैन आदी सह असंख्य सदस्य उपस्थित होते.
“यश कोणत्याही एकाच व्यक्तीचे नसून ते सर्व सदस्यांच्या एकजुटीचे, टीमवर्कचे व समर्पणाचे फलित आहे. वर्षभर राबविलेल्या प्रत्येक प्रकल्पाचा हा सन्मान आहे,” अशी भावना अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी व्यक्त केली.
सेवाभावाची बांधिलकी, उत्कृष्ट समन्वय व सक्रिय सहभाग यांचे प्रतिबिंब या सन्मानातून उमटले असून, “Together We Serve – Together We Win” या ब्रीदवाक्याप्रमाणे पुढील वाटचालीत आणखी मोठी यशे संपादन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




