
अमळनेर : तालुक्यातील सात्री येथील सरपंच महेंद्र बोरसे यांच्या वाहनाला भीषण अपघात होऊन ते जखमी झाल्याची घटना १७ रोजी दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी मुसळी गावाजवळ घडली.
सरपंच महेंद्र बोरसे हे अनेक वर्षापासून रखडलेल्या सात्री गावाच्या पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिकारीकडे बैठीकीसाठी आपल्या वाहन क्रमांक १२३४ ने जळगाव जात असताना मुसळी गावाजवळ अचानक काहीतरी आडवे आल्याने त्यांनी ब्रेक दाबला आणि वाहनाचे संतुलन बिघडले समोर असलेल्या पिकअप व्हॅन चा दरवाजा उघडा असल्याने ते वाचवायला जात असताना त्यांचे वाहनाने पलटी खाऊन झाडाला ठोकली गेली. अपघात इतका भीषण होता की वाहनांच्या एअर बॅग उघडल्या. त्यांचे मानेला , खांद्याला , पोटाला आणि डोळ्याला दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




