
अमळनेर : येथील धुळे रोडवरील प्रवेशद्वाराला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देऊन ‘राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी सार्वजनिक शिवजयंती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत मुख्याधिकारी गणेश शिंदे व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल्याने हा सुवर्णयोग साधून नामकरणाचा निर्णय जाहीर करावा, अशी शिवप्रेमींची भावना असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्यास शहराच्या वैभवात भर पडेल तसेच नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण होईल, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती समितीचे भुषण पाटील, अक्षय शिर्के, राहुल कंजर, तुषार सोनार, भूषण महाजन, अमर सोनार, गणेश अहिरे, देव गोसावी, दादा सोनार, पंकज न्हावी, भावेश साळुंखे, मनोज शिंगाणे, लोकेश महाजन, आशिष अंधारे, कृष्णा पाटील, विपूल पाटील, योगेंद्र बाविस्कर, भागवत पाटील,जयेश चव्हाण, शुभम पाटील,राहुल अहिरे,गौरव पाटील,तूषार सोनार, वैभव पाटील,गोविंदा परदेशी, गणेश पाटील,सनी चौधरी, मोहित शिंदे आदी उपस्थित होते.




