
अमळनेर:- तालुक्यातील गांधली पिळोदे येथील बालाजी विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष 2025 26 वर्षाच्या इयत्ता दहावीचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात दि.१७ रोजी संपन्न झाला. प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार केला व भेटवस्तू देऊन आशीर्वाद घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक एस के काटे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच एन वाय पाटील यांचे मार्गदर्शन कार्यक्रमास लाभले.शितल कोळी, जानवी कोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रसंग्गी कार्यक्रमात जयेश निकुंभ, राज वारुळे,मनीष शिंदे , रॉबीन मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयी आपले ऋण व्यक्त केलं. शेवटी अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापकांनी भय मुक्त परीक्षा व दहावीनंतर शिक्षणातल्या विविध शाखा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नंतर गायत्री पाटील हिने मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त करून वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांसोबत फोटो घेतला व विद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली आणि अल्पोपहाराचा आनंद घेतला.




