
अमळनेर:- शहरातील प्रभाग क्र. १६ मधील डीडी नगर ते भारत गॅस ऑफिस धुळे रस्त्यापर्यतच्या मुख्य रस्त्यावर गेल्या तीन वर्षापासून अंधार होता.
प्रभागाचे नगरसेवक रवि पाटील तसेच नगरसेवक महेश देशमुख यांनी तात्काळ मुख्याधिकारी गणेश शिंदे व दिवाबत्ती अभियंता कृणाल महाले व रवि उदयवाल यांच्याशी संपर्क साधून तेथे नवीन लाईट टाकून मुख्य रस्ता प्रकाशमय करण्यात आला. कामाच्या ठिकाणी रवि पाटील, महेश देशमुख, दिपक पाटील, धनंजय देसले, रामकृष्ण पाटील, युवराज पाटील, विजय माळी, जिजाबराव पाटील यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी आबिद शेख, मनोज सोनार, दिपक मद्रासी आदी उपस्थित होते.




