
अमळनेर:- शहरातील श्रीरंग कॉलनीजवळ चारचाकीने दुचाकी ला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना 11 रोजी घडली आहे याप्रकरणी चारचाकीचालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी चंद्रकांत धनराज पाटील (राहणार अमळगाव हल्ली मुक्काम समर्थ नगर अमळनेर वय 44) हे ११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम एच 19 सीई 7947) हिने विजय मारुती मंदिराकडे जात असताना श्रीरंग कॉलनी जवळ समोरून येणारे चार चाकी (क्रमांक एम एच 19 इ ए 53 49) वरील चालकाने भरधाव वेगाने येऊन दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वाराच्या डावा हात, डावा पाय, चेहरा व कपाळावर दुखापत झाली असून अनेक ठिकाणी मुका मार लागल्याने त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.




