
अमळनेर: पतंजली महिला योग समिती अमळनेर तहसील तर्फे शिव जन्मोत्सव निमित्त काल पहाटे शिवपहाट प्रभात फेरी काढण्यात आली.
शिवजयंती निमित्त पहाटे 6 वाजता सर्व योग वर्ग क्रांतीपर्व स्मारक ढेकू रोड येथे एकत्र आल्यानंतर तेथून प्रभात फेरी काढण्यात आली. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शिवाजी महाराज व योग संदर्भात योग शिक्षक व योग साधक यांनी घोषणा दिल्या. ढेकूरोड वरून जिजाऊ प्रवेशद्वाराजवळ मराठा सेवा संघ यांच्या नियोजित गीत गायन कार्यक्रम झाला. त्यात महिला पतंजली योग समितीच्या अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार व पंतजलीच्या अधिकारी प्रा.उषा पवार यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमा पूजन करण्यात आले. स्टेशन रोड मार्गे प्रभातफेरी नाट्यगृह येथे पोहोचल्यावर शिवरायांचे पूजन करण्यात आले. कामिनी पवार व रूपाली पवार यांनी आपल्या खास शैलीत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन अमळनेर तहसील प्रभारी कामिनी पवार व रत्ना भदाणे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व योग शिक्षिकांनी परिश्रम घेतले बहुसंख्य योग साधकानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.




