
विद्यमान कार्यकारिणीला शासनाकडून प्रशासकीय समिती म्हणून सहा महिने मुदत वाढ…
अमळनेर : राज्यातील २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने या ग्रामपंचायतींवर सरपंचानाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश दिले असून उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची प्रशासकीय समिती नेमण्याचेही आदेशात अधिसूचनेत नमूद आहे. त्यामुळे सहा महिने किंवा पुढील निवडणूक होत नाही तोपर्यंत विद्यमान कार्यकरिणीच कारभार पाहणार आहे.
अमळनेर तालुक्यात ११९ ग्रामपंचायती आहेत. त्यातील आंचलवाडी , आर्डी ,आटाळे, बोदर्डे, बोहरा , धानोरा , दापोरी बुद्रुक , धावडे ,ढेकू खुर्द , देवगाव , चौबारी ,एकलहरे , एकतास ,फापोरे बुद्रुक , एकरुखी , गांधली ,गडखांब , गलवाडे खुर्द ,गलवाडे बुद्रुक , हिंगोणे खुर्द प्र अ ,हिंगोणे खुर्द प्र ज , जवखेडा ,जुनोने , जळोद , करणखेडे ,कळमबे ,कलाली , कावपिंप्री , कळमसरे , कंडारी , कुऱ्हे बुद्रुक ,खेडी प्र ज,खवशी ,खेडी प्रअ , लोण खुर्द,लोण चारम, मेहेरगाव , म्हसले मांडळ ,मुडी प्र अ, निंभोरा ,नांद्री , निम ,पिळोदे ,पातोंडा , पाडसे ,पळासदळे , प्र डांगरी ,पिंगळवाडे ,पिंपळे बुद्रुक , पिंपळी प्र ज , पाडळसरे , रामेश्वर बुद्रुक ,रामेश्वर खुर्द , सारबेटे बुद्रुक , सारबेटे खुर्द ,सावखेडा , सबगव्हाण ,सोनखेडी, सात्री , शिरूड , शहापूर , तांदळी , टाकरखेडे , वासरे , वाघोदे , झाडी आदि ६७ ग्रामपंचयतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सह सचिव वर्षा भरोसे यांनी ग्रामपंचायत अधिनियम १८२ (१) प्रमाणे कलम १५१ प्रमाणे प्रशासक नेमण्याचे अधिकार जिप च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे पुन्हा विद्यमान कार्यकरिणीला एकप्रकारे ग्रामपंचायत कारभार पाहण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.



