
अमळनेर : कार च्या पुढे मोटरसायकलवर फोन वर बोलणाऱ्या तरुणाचे आणि हॉर्न वाजवल्यावरून कार चालकाचे भांडण होऊन त्याचे रूपांतर कारवर दगडफेक झाल्याची घटना तालुक्यातील डांगर येथे घडली. चौघांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार पवार याने फिर्याद दिली की, ते १९ रोजी धुळ्याहून कार क्रमांक एम एच ५४ बी ७००७ येत असताना कोंढावळ गावाच्या पुढे एक तरुण मोटरसायकल वर फोनवर बोलत होता. त्याला थांबवून कार चालकाने फोनवर का बोलत आहे याचा राग आला. त्यावेळी त्या तरुणाने तुम्ही हॉर्न का वाजवता रस्ता तुमच्या बापाचा आहे का म्हणून बोलला त्यात त्यांचे वाद झाले आणि तरुणाने तुम्ही पुढे या म्हणून धमकी दिली. डांगर गावाजवळ येताच रस्त्यावर ट्रॅक्टर आडवे लावले होते. त्यावेळी दोन तीन तरुण आले आणि त्यांनी गाडीवर दगड मारणे सुरू केले. कार चालकाने फोटो काढायला सुरुवात केली असता एकाने मोबाईल ला दगड मारून तो खाली पडला. कार चालक ट्रॅक्टर चुकवून गाडी काढून पळत असताना ट्रॅक्टर वल्याने कार ला धडक दिली आणि नुकसान केले. या भानगडीत तुषार ची २३ ग्राम सोन्याची चेन कुठेतरी पडून हरवली. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून शुभम सुनील पाटील ,मुकेश प्रकाश सोनवणे , सुनील धुडकू पाटील , धीरज सुनील पाटील यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(२) ,१२६(२) १२५(अ), ३५१(२) ,३५२ , ३२४(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत.




