
अमळनेर : पैसे दामदुप्पट करण्याच्या नावाखाली अमळनेरच्या केळी व्यापाऱ्याला तब्बल ११ लाखात गंडवणाऱ्या अजिंठा व संभाजीनगर येथील आरोपीविरुद्ध जादू टोणा व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अमळनेर न्यायालयाने कलम १७५(३) प्रमाणे दिले आहेत.

अमळनेर येथील आसिफ छोटू बागवान हे केळी व्यापारी व्यापारनिमित्त नेहमी संभाजीनगर ,अजिंठा येथे येत जात होते. त्याठिकाणी त्यांची ओळख शेख मुजाहिद शेख मुकीत , अकबर मकबूल मेवाती , अब्दुल मुक्कीम अब्दुल खालिफ शेख , प्रकाश गायकवाड , नंदू जाधव , शाहरूख अब्दुल मुकीत ,फिरोजखा भिकनखा मेवाती यांच्याशी झाली. त्यांनी सर्वांनी आसिफ बागवान याला तुला रक्कम दामदुप्पट करून देतो आम्ही अनेकांची रक्कम केली आहे असे सांगितले. त्यांचे नेहमी अमळनेर ला आसिफ बागवान यांच्याकडे येणे जाणे होते. सुरुवातीला आसिफ याने नकार दिला मात्र १७ डिसेंम्बर २०२२ रोजी त्यांनी त्याला जाळ्यात ओढून त्याच्या घरात पूजा विधी करून पैसे दुप्पट करून देण्याचे ठरवले. आसिफ याने पत्नीचे दागिने विकून व इकडून तिकडून अझे ११ लाख रुपये त्यांना आणून दिले. ही पूजा घातक असते यात जीव जाऊ शकतो म्हणत त्यांनी असिफला घराबाहेर काढले आणि पूजेच्या नावाखाली खोलीत धूर केला. याचा फायदा घेत एकाने खरी रक्कम जॅकेट च्या आतील खिशात घालून त्याठिकाणी नकली नोटाचे बंडल ठेवले त्यावर एक एक खरी नोट लावून त्यांनी असिफला त्यावर तांदूळ टाकायला व मंत्र म्हणत रहा असे सांगितले. त्यांनतर त्यांनी धुळे रोड ला सोडायला सांगितले. असिफने नंतर नोटा तपासल्या असता त्या नकली निघाल्या. म्हणून त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना पकडून आणल्यानन्तर त्यांनी प्रतिज्ञापत्र द्वारे ५ लाख रुपयांची मुकुंदवाडी येथील मालमत्ता आणि ६ लाख रुपयांचा धनादेश लिहून दिला. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही. मात्र ती मालमत्ता आणि धनादेश दोन्हीही बनावट निघाल्याने आसिफ बागवान यांनी ऍड सलमान शाह यांच्यामार्फत अमळनेर न्यायालयात याचिका दाखल केली. उपलब्ध पुरावे ,कागदपत्र व पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्या यलमाणे यांनी २४/२/२६ रोजी सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(२) ,३१९,३१८(४) , ३१६(२),३३६(२) ,३३८ ,३३६(३) , ३५२,३५१ (१)(३) ,३(५) प्रमाणे जादू टोणा कायदा व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ऍड साजिद शाह,ऍड जुनेद शेख यांनी सहकार्य केले.




